Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

अखेर आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी आणिक मुद्दे हे मांडले आहेत.

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

काल दिनांक १ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. काल झालेल्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क हे लावले जात आहेत. अखेर आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी आणिक मुद्दे हे मांडले आहेत.

शरद पवार हे त्यांच्या एका कार्यक्रमासाठीच आमंत्रण द्यायला मुख्यमंत्र्यांकडे गेले होते त्यात राजकारण काय ? असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्याच्या दुर्दैवाने मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसलेली आहे तो त्या पदाचा मान आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी ते गेले. त्यांचा सिंहासन लवकरच हलणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती एखादा नेता मुख्यमंत्र्यांना भेटला तर चुकीचं काय, आम्ही सुद्धा निवेदन देत असतो. जोपर्यंत ते खुर्चीवर बसले आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे प्रश्न मांडत राहणार असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत

तसेच पुढे त्यांनी महाअधिवेशनावर देखील भाष्य केले आहे. दिनांक १८ तारखेला शिवसेनेचे महाअधिवेशन आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाअधिवेशन असणार आहे. देशातून शिवसेनेचे प्रमुख नेते हे उपस्थित राहतील. महाविकास आघाडीतील लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप हे सुरळीतपणे पार पडेल एकत्र बसून त्याच्यावर चर्चा होईल प्रत्येक जागेवर चर्चा होईल. विधानसभेच्या जागावाटप देखील त्याच पद्धतीने होईल आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाही, वज्रमुठ कायम राहील. बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे, हा या महाधिवेशनाचा अजेंडा असणार आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हे राज्य चालवतो. हा सोहळा उत्तम प्रकारे करणे हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, महाराजांच्या संदर्भात जेवढा अभ्यास करायचा तेवढा थोडा आहे. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना समान स्थान होतं. छत्रपतींनी सर्वांवर विश्वास ठेवला आणि राज्य घडवलं. मोहन भागवतांना नवीन व्याख्या सापडली असेल, सध्या इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version