Saturday, March 2, 2024

Latest Posts

Sharad Pawar Live, कांद्याच्या प्रश्नावर आता शरद पवार मैदानात, म्हणाले…

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही

सध्याच्या कांद निर्यातीवरून राज्यात अनेक घडामोडी या घडत आहेत. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. यावेळी शरद पवार यांनी जनतेशी संवाद हा साधला आहे.

यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार ९ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. आज पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे.

यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले आहेत की, देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे सरकारच्या धोरणामुळे तुमच्या कष्टाला किंमत नाही. केंद्राला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. नाशिक जिल्यातील शेजारी हवालदिल झाले आहेत. ताटात कांदा मिळतो त्यासाठी तुम्ही कष्ट करता. नाशिक हा शेतीसाठी महत्वाचा जिल्हा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. तसेच, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss