शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक उभारणार, अब्दुल सत्तार यांची घोषणा

सिल्लोडच्या धर्तीवर सोयगाव दिवंगत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक उभारणार, अब्दुल सत्तार यांची घोषणा

सिल्लोडच्या धर्तीवर सोयगाव दिवंगत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी रविवारी सायंकाळी भेटीच्या दरम्यान ही घोषणा केली आहे. १९ जून रोजी साजरा होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद अब्दुल सत्तार सोयगावात बोलत होते.

सोयगाव नगरपंचायत प्रशासनाने शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी जागेचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी केले आहेत. कृषिमंत्री सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. अब्दुल सत्तार यांनी आता सोयगाव शहरांत शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा केला आहे.

येणाऱ्या वर्षभरामध्ये सदरील स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांच्या स्मारकास सोयगावात अभिवादन करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोषणेनंतर तमाम शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version