Saturday, May 18, 2024

Latest Posts

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या चौकशीनंतर न्यायालायात देखील अहवाल सादर करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या चौकशीनंतर न्यायालायात देखील अहवाल सादर करण्यात आला आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर आरो करण्यात आला होता की अल्पवयीन महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तोच गुन्हा मागे घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार रद्द करण्याचा अहवाल देखील दाखल केला आहे. सहा महिला कुस्तीपटूंच्या संदर्भामध्ये पोलिसांनी एक हजार पानांची आरोपपत्र दाखल केले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आता कुस्तीपटूंच्या मागणीवर दिल्ली पोलिसांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

यावर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकने तिची प्रतिक्रिया दिली आहे आणि माध्यमांशी बोलताना म्हणाली की, चार्जशीटमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की बृजभूषण सिंह हे दोषी आहेत. परंतु आमच्या वकिलांना कोर्टातून आरोपपत्र मिळाल्यानंतर आरोपांविषयी सविस्तर जाणून घेण्यात येईल. आधी आमहाला दिलेली आश्वासन पूर्ण होत आहेत का ते आम्ही पाहू त्यानंतरच आम्ही पुढची पाऊले उचलू असा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

२८ मे रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या इतर जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर कुस्तीपटूंच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहचवल्या संदर्भामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची केली आहे.

हे ही वाचा : 

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss