Saturday, May 18, 2024

Latest Posts

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

दरवर्षी दिनांक २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी भाजपने एक मेगा प्लॅन तयार केला आहे.

दरवर्षी दिनांक २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी भाजपने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिन सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत, तर दुसरीकडे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांपासून ते देशातील इतर नेते कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

दिनांक २१ जूनपासून पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा सुरू होत आहे. ते २३ जूनपर्यंत अमेरिकेत राहणार असून त्यानंतर २४ आणि २५ जून रोजी ते इजिप्तला भेट देणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय राजधानी दिल्लीतच योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोचीमध्ये भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाज INS विक्रांतवर योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. योग दिनानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालय गोव्यात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल स्वत: गोव्यातील पणजी येथे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उपाध्यक्ष जगदीप धनखर मध्य प्रदेशातील जबलपूर येथे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व खासदार आणि आमदारांना आपापल्या भागात योग दिनाशी संबंधित मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपच्या सुमारे २५० बड्या नेत्यांना पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करणारा ठराव मंजूर केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशातील आणि जगातील अनेक लहान-मोठ्या संस्थाही आपापल्या स्तरावर योग दिन उत्साहात साजरा करतात. कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

हे ही वाचा : 

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss