Friday, May 17, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे यांना आणखीन एक झटका रामदास कदमांचा शिवसेनेला रामराम

शिवसेना नेते रामदास कदम यांनीही शिवसेना पक्षाचा निरोप घेतला आहे.

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनीही शिवसेना पक्षाचा निरोप घेतला आहे. याबद्दल त्यांनी रीतसर राजीनामा दिला आहे. राम कदम विधानसभेत चार वेळा आमदार राहिले आहेत. 2010 मध्ये ते विधान परिषद सदस्य ही झाले याशिवाय ते शिवसेना-भाजप सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री देखील होते.
राम कदम यांनी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे. त्यापूर्वी त्यांचे पुत्र व आमदार योगेश कदम यांनी गुवाहाटी येथे जाऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना दररोज काही ना काही धक्कादायक घडत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक आमदार हे राजीनामा देत आहेत. एकनाथ यांच्यासह पक्षातील 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेनेतील आमदार व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गट बळकट करण्याचे काम केले आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने मैदानात उतरली आहे.
रामदास कदम यांनी पत्राद्वारे म्हटले की, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाले नंतर पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण व्यस्त कार्यक्रमांमध्ये शिवसेना नेत्यांचे विश्वास घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले याची मला खंत आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले मातोश्रीवर कोणी काही बोलले तरी मीडियासमोर अजिबात जायचे नाही मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही यामागचे कारण मला आजपर्यंत करू शकले नाही. मागील तीन वर्षापासून तोंड दाबून मुक्याचामार मी सहन करत आहे.ज्या ज्या वेळी मी शिवसेनेवरती संकट आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभा महाराष्ट्र ने पाहिला आहे व महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे” असे रामदास कदम यांनी आपल्या पत्रातून म्हटले.

Latest Posts

Don't Miss