Tuesday, May 21, 2024

Latest Posts

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी Siddaramaiah यांची निवड तर D. K. Shivakumar यांच्या बाबत सस्पेन्स कायम

नुकतीच कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी ही उडाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा दमदार विजय हा झाला आहे.

नुकतीच कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी ही उडाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा दमदार विजय हा झाला आहे. निकाल लागून आता तब्बल ४- ५ दिवस झाले आहेत. कर्नाटकात तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचा दमदार विजय हा झाला आहे. आज अखेर ५ दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा कारभार कोण सांभाळणार याचा तिढा हा सुटलेला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केला.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. निवडणुकांचा निकाल लागला तेव्हापासून मुख्यमंत्रिपदासाठी डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात शर्यत सुरू होती. त्यांच्या अनेक बैठकांवर बैठका देखील झाल्या अन् अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला आहे. पण या सगळ्यानंतर डी के शिवकुमार यांना काय पद मिळणार किंवा त्यांची भूमिका काय असणारा हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डी के शिवकुमार यांनीदेखील मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला होता परंतु आता सिद्धरामय्या यांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी ठरवण्यात आले आहे अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता डी के शिवकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. अखेर आज पक्षश्रेष्ठींनी याबाबत निर्णय दिला आहे. तसेच काही वेळा आधी डी के शिवकुमार यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. पण आता अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पडदा उठला आहे.सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यांच्या या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे डी के शिवकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सिद्धरामय्या उद्या दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. बंगळुरूमध्ये उद्या महत्वाची बैठक पार पडेल. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss