Saturday, May 18, 2024

Latest Posts

माध्यमांशी बोलताना सुप्रिया ताईंनी दिले विरोधकांना सडेतोड उत्तर

काल राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड केली आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्राबरोबर पंजाब, हरियाणाची जबाबदारीही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. शरद पवारांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी पुण्यामधून संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत विरोधकांच्या घराणेशाहीच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

आज सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही सुरु झाली आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी रोकठोक उत्तरे दिली आहेत. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, होय ही घराणेशाही आहे, हे मला मान्य आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे. परंतु जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत, ज्या पक्षातील लोकांकडून ही टीका होत आहे, त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी संसदेत दाखवून दिले आहे. मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार शरद पवार यांची मुलगी म्हणून मिळाला नाही. मी संसदेत केलेल्या कामांमुळे मिळाला आहे असे सडेतोड उत्तर सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीने विरोधकांना संपण्याआधी स्वतःच्या सोबत असणाऱ्या सहकारी पक्षाला संपवले. आता विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी लावला आहे. कॅगचा रिपोर्ट चिंताजनक आहे. हा रिपोर्ट काय सांगतो याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ओडिशा रेल्वे अपघात केंद्र सरकारच्या दुर्लक्ष झाल्यामुळे झाला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता है लेकीन…

सु्प्रिया ताईंना अजितदादांची मदत मिळणार नाही? Will Ajit pawar support Supriya Sule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss