Saturday, May 18, 2024

Latest Posts

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राहुल नार्वेकर म्हणाले…

स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राहुल नार्वेकर यांनी एक विधान केले आहे. आणि आता य विधानमंउळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलंच उधाण हे आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठया उलथापालथी होत आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल हा लागला आणि पुढील इतर ही विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात पोहचली आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता काय निर्णय घेणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राहुल नार्वेकर यांनी एक विधान केले आहे. आणि आता य विधानमंउळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलंच उधाण हे आलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं आहे.

बाळासाहेब देसाई यांच्या निर्णयक्षमतेवर भाष्य करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे विधान केले. नार्वेकर म्हणाले- “बाळासाहेब देसाईंच्या सामाजिक कार्याचा वारसा शंभूराज देसाई पुढे नेत आहेत, बाळासाहेब देसाईंनी आपल्या कार्याने साम्राज्य उभे केले, त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मला पाचारण करण्यात आले हे माझे भाग्य आहे.” पुढे राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकर यांनी सूचित केलं आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं.

पुढे राहुल नार्वेकर म्हणाले की, आपल्या १४ व्या विधानसभेत अनेकांनी काम केले, त्यापैकी एक बाळासाहेब देसाई यांनी त्यांचे कार्य चिरकाल केले. EBC, शिक्षण विभागातही त्यांनी खूप काम केले, EBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. बाळासाहेब देसाई यांनी महसूल खात्याची जबाबदारी पार पाडताना अनेक मोठे निर्णय घेतल्याचे राहुल नार्वेकर सांगतात. मालोजीराजांनंतर पीडब्ल्यूडीची जबाबदारी बाळासाहेबांवर आली, त्यांनी दर्जेदार काम केले, घरच्या खात्याची जबाबदारीही अतिशय चोखपणे सांभाळली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, माझ्या दृष्टिकोनातून १९७७ – ७८ चे काम अत्यंत महत्त्वाचे होते. १९७७ मध्ये माझा जन्म झाला तेव्हा बाळासाहेब विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांच्या प्रेरणेने मी त्यांच्यासारखा क्रांतिकारी निर्णय घेईन, निर्णय उघड करणार नाही.

हे ही वाचा:

मुंबईतील घटनेवरून अमित ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

ठाकरे पिता-पुत्रांनी डावलले, तिरुपती बालाजीने मात्र स्विकारले!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss