Tuesday, April 23, 2024

Latest Posts

ठाकरे गटाचे खासदार स्पष्टचं बोलले, Raj Thackeray यांचं बरोबर आहे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM EKNATH SHINDE) यांनी मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांच्या मराठा आरक्षणाच्या (MARATHA RESERVATION) मुद्द्यावर निर्माण केलेल्या मागण्या पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले होते. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्याबाबतीत राज ठाकरे यांचा प्रश्न योग्य आहे. मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. जरांगे-पाटील साधा माणूस आहे, असे संजय राऊत (SANJAY RAUT) पुण्यात माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे (RAJ THACKERAY) ? 

श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!

सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस…

INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावाच्या नावाखाली क्राउड फंडिंगकडून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला. त्याचा गुन्हा दाखल झाला, कोर्टाने जामीन नाकारला त्याचा आणि त्यांच्या मुलाचा. ते भुमीगत झाले, त्यानंतर त्यांनी सरकार आल्यावर जामीन मॅनेज केला. ईडी तेथेही येऊ शकली असती. भारतीय जनता पार्टीचा एक लफंगा पैसे गोळा करतो, सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस गुन्हा मागे घेतात. हा कोट्यावधी रुपया अपहार आहे. दोन एक हजार रुपये जमा केले म्हणुन तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल मोकळा कसा? जे भारतीय जनता पार्टीत नाहीत त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. हे जे चाललं आहे त्यामागे मुलुंडचा नागडा माणूस आहे, पोपटलाल असे संजय राऊत (SANJAY RAUT) म्हणाले.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss