Monday, May 20, 2024

Latest Posts

Kalyan चा तिढा सुटला पण Thane च्या जागेवरून Shivsena-BJP मध्ये वाद कायम..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मोठी घोषणा करत आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Loksabha Constituency) विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून वाद होते. या जागेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी हक्क सांगितला होता. त्यामुळे, महायुतीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता, कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले असले तरीही ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजप मध्ये वाद कायम आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून (Thane Loksabha Constituency) लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी आपला हक्क सांगितला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष उत्सुक आहेत. कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण मधून भाजपचाच उमेदवार व्हावा असा आग्रह करत श्रीकांत शिंदे यांच्या नावाला विरोध केला. तसेच श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आता ठाण्यामधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक यांचे नाव पुढे येत आहे. तसेच, शिवसेनेकडून प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), रवींद्र फाटक (Ravindra Phatak) तसेच नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजप कार्यकर्तेदेखील या जागेसआठी दावा करत आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर

देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सांगितले, “कल्याणच्या जागेवर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे असतील. भारतीय जनता पक्षाकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाला अजिबात विरोध नाही भारतीय जनता पक्ष श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. आमही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने ते यावेळी निवडून येतील. आम्ही महायुतीतील सर्व घटकपक्ष त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

ठाणे लोकसभा शिंदेंकडे, संजीव नाईकांच्या हाती धनुष्यबाण ? भावी मंत्रिपदासाठी सरनाईकांचे आस्तेकदम

बीफ पार्टी करत मोदी-शहांवर टिका करणारे निरूपम फडणवीसांचे की शिंदेंचे? | Sanjay Nirupam

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss