Sunday, May 19, 2024

Latest Posts

Cabinet Meeting : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

मुंबई : तब्बल 39 दिवसांनी काल राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतली. या मंत्रिमंडळात शिंदे गटातील 9 आमदार व भाजपातील 9 आमदारांचा समावेश आहे. विस्तारित मंत्रिमंडळाची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत होत्या. यावरून विरोधी पक्षांकडून सतत टीका केल्या जात होत्या.

मात्र काल अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. आणि आज राज्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी माहिती दिली. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातील याकडे राज्याचे लक्ष आहे.

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजम झाल्या नंतर दोघाचेच मंत्रिमंडळ होते. त्यामुळे विरोधी पक्षाकडून सतत टीका केली जात होती. सत्तेत आल्यानंतर पार पडलेल्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे आणि फडणवीस यांनी घेतले आहेत. मविआ सरकारने घेतलेले अनेक निर्णयामध्ये शिंदे सरकार बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आणि आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

शिंदे गटातील मंत्र्यांना भाजपचा विरोध ?

Latest Posts

Don't Miss