Sunday, May 19, 2024

Latest Posts

मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल, देवेंद्र फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल

मागच महाविकास आघाडी सरकारने वसुलीचे सर्व उच्चांक गाठले. त्या काळात लोक वर्क फ्रॉम होम करत होते, तसेच मंत्रीही वर्क फ्रॉम जेल करत होते. जेलमध्ये असूनही नेत्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

सध्या महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याचपार्श्वभूमीवर अमरावती विभागातील विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे रणजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मागच महाविकास आघाडी सरकारने वसुलीचे सर्व उच्चांक गाठले. त्या काळात लोक वर्क फ्रॉम होम करत होते, तसेच मंत्रीही वर्क फ्रॉम जेल करत होते. जेलमध्ये असूनही नेत्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अमरावती विभागातून भाजपकडून रणजित पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उपस्थितीत धीरज लिंगाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवणार आहे. भाजपचे रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यामध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची लढत होणार आहे. तर आज रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रणजित पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलं. ते म्हणाले,”रणजीत पाटील १२ वर्षांपासून पदवीधर मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या अनुपस्थितीत देखील त्यांनी पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून चांगलं काम केलं आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा भाजपाला ही जागा मिळाली आहे. सध्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्री नाहीत त्यामुळे त्यांचा कारभार देखील आम्हाला पाहावा लागतो. आजही सभागृहात पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात,”असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रणजित पाटलांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अमरावतीतील या सभेसाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील उपस्थित होत्या. यावेळी भाषण करतांना नवनीत यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे.”देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, यात शंका नाही”, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. या सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले,‘पदवीधर आणि शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांचं सरकार यावं लागलं. मागचं सरकार हे फेसबुक लाइव्ह आणि टोमणे सरकार होतं”, अशी टीका बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली. पुढे त्यांनी म्हटलं,”आपलं सरकार आल्या बरोबरच ओबीसीला आरक्षण देण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारने केलं. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नाशिकमधील ११७ अपक्ष सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. खऱ्या अर्थाने जनेतला न्याय देण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारने केलं आहे. दोन वेळच्या निवडणुकीपेक्षा दीड पट जास्त मते हे रणजित पाटील यांना मिळतील”, असा विश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

अभिनेत्री निकिता रावलचा अनोखा अंदाज, चक्क भाज्यांचा पेहराव करून केलं फोटोशूट

‘शहजादा’चा ट्रेलर उद्या होणार रिलीज, कार्तिक आर्यनने पोस्ट शेअर दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss