Tuesday, April 23, 2024

Latest Posts

सत्ताधाऱ्यांनी केली जोरदार टीका, ठाकरेंची मशाली पेटणार नाही अन् पवारांची तुतारी वाजणार नाही!…

भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत की, मी मागच्या वेळस सांगितलं होतं की स्फोट होणार आहे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्यांच्या या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर झाले आहे. हे अनावरण होत असताना सत्ताधारी पक्षाने मात्र जोरदार टीका ही केली आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती तर आता भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलत असताना भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत की, मी मागच्या वेळस सांगितलं होतं की स्फोट होणार आहे…. त्यावेळेस काँग्रेसमध्ये फूट झाली. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी दसरा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल या सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीची नावाबाबत बोलताना ती तुतारी प्राण पणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी. हाच त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. सहा मंत्र्यांना खासदारकीच्या उमेदवारीवरून बोलताना गिरीश महाजन यांनी आमच्या वरीष्ठ स्तरावरील नेते हा निर्णय घेतील. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांच्यात चर्चा झाली असेल ती अजून बाहेर आली नाही ती केवळ अफवा आहे. लोकसभेच्या उमेदवारी ही केंद्रीय पातळीवरून उमेदवारीची घोषणा होते, असं महाजन म्हणाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला ३ चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. शरद पवार या चिन्हाचे अनावरण आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगडवर होत आहे. त्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. स्वतः शरद पवारसुद्धा कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल ४० वर्षानंतर रायगडवार गेले आहेत. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.

हे ही वाचा:

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे – CM Eknath Shinde

महाराष्ट्राची लोकप्रिय कला जपण्यासाठी ‘सन मराठी’ वाहिनी घेऊन येते नवीन कार्यक्रम ‘लावणी महाराष्ट्राची’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss