Wednesday, February 28, 2024

Latest Posts

संजय राऊतांच्या टीकेवर शिंदे गटाच्या तीन नेत्यांनी दिलं प्रतिउत्तर, म्हणाले…

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर वारंवार टीका करताना दिसून येत आहेत.

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर वारंवार टीका करताना दिसून येत आहेत. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यावर आता शिंदे गटाच्या एक दोन न्हवे तर तीन नेत्यांनी प्रतिउत्तर हे दिले आहे.

शिंदे गट कमळाबाईच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील नेत्यांनी पलटवार केला आहे. शिंदे गटातील तीन नेत्यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट, उदय सामंत, राहुल शेवाळे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. तर भाजपकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.

शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आम्ही 13 खासदार बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत. सर्व खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. काहीजण अफवा पसरवत आहेत. अशी कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळींवर झाली नाही. परंतु शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची यापूर्वी चर्चा झालीय, राहुल शेवाळे म्हणालेत.

शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहेत. शिंदे गट कमळावर निवडणूक लढणार ही बातमी खोटी आहे. हे बातमी पेपरमध्ये संजय राऊत यांनीच पेरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी भरत गोगावलेंची तुलना करत आहेत. संजय राऊत हा भुंकणारा कुत्रा, त्याने भुंकत राहावं. हत्ती चले बाजार कुत्ते भोंके हजार अशी संजय राऊतची अवस्था आहे. शिवसेनेचे सर्व खासदार धन्युष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे. यावर कुणीही शंका घेऊ नये, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर मंत्री उदय सामंत यांनीही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचे उमेदवार कमळावर लोकसभा लढणार या अफवा पसरवल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने चिन्ह आम्हाला दिलंय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावरंच शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुका लढणार आहोत.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss