आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्हीपण… Kolhapur मतदारसंघावरून Uddhav Thackeray यांचा Mahayuti वर हल्लाबोल

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरुद्ध महायुतीने उमेदवार दिल्याने खरपूस भाषेत टीका केली आहे.

आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्हीपण… Kolhapur मतदारसंघावरून Uddhav Thackeray यांचा Mahayuti वर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी आता देशभर सुरु आहे. देशामध्ये २ टप्प्यांमधील मतदान पार पडले असून अजून पाच टप्प्यांमधील मतदान बाकी आहे. अश्यातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १४ मी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यावरून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून आता कोल्हापूरच्या जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीवर टीका करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्याविरुद्ध महायुतीने उमेदवार दिल्याने खरपूस भाषेत टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका करत, ‘आम्ही शेण खाल्ले म्हणून तुम्हीसुद्धा खाणार का? ‘ असा सवाल महायुतीच्या नेत्यांना केला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Loksabha Constituency) महाविकास आघाडीच्या प्रचारसभेदरम्यान उद्धव ठाकरे यानीही वक्तव्य केले आहे. कोल्हापूरच्या जागेवरून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. तर, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्यासाठी शिंदे गटाने राज्यसभेचा मुद्दा बाहेर काढला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी उबाठा गटावर टीका करत, “राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली नाही. मग राजघराण्याचा आता का पुळका आला?” असा सवाल विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले, “मी चुकलो असें तर संभाजीराजे यांची जाहीर माफी मागतो. पण, मी जी चूक केली ती शाहू महाराजांच्या विरोधात तुम्हीसुद्धा करणार आहेत का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीवेळी मला एक कुणकुण लागली होती. त्यावेळी त्यांनी संजय पवार यांना पाडलं. तेव्हा जर असाच दगाफटका झाला असता तर ते पाप कोणाच्या माथी लागलं असतं. मी जर संभाजीराजे यांच्याविरोधात चुकीचा वागलो असेल, तर त्यांची जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजे यांच्याबद्दल मी चुकलो असेल तर आज तीच चूक तुम्ही शाहू महाराज यांच्याबाबतीत करणार आहात का? तुम्ही त्यांना पाडायला का उभे आहेत?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“तुम्ही चूक करत आहेत आणि हि चूक आम्ही दाखवल्यावर आमच्याकडेच बोट करताय. आम्ही शेण खाल्लं असेल. पण आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही का शेण खाताय? शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. या माणसाने मी कोणीतरी आहे हे कधीच जाणवून दिलं नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो होतो. मी वयाने लहान होतो. पण माझयासोबत ते फार आदराने वागले होते. हाच त्यांचा मोठेपणा आहे.” असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

Kalyan-Dombivali मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन, भव्य रॅलीत असणार मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version