Friday, May 17, 2024

Latest Posts

Kalyan-Dombivali मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन, भव्य रॅलीत असणार मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अनेक दिवसांपासून ठाणे व कल्याण येथून उमेदवारी कोण लढवणार हा प्रश्न उभा होता. काल १ मे रोजी शिवसेनेने अधिकृत घोषणा करत कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून डॉ.श्रीकांत शिंदे तर ठाणे मतदार संघातून नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित झाले आहे.

अनेक दिवसांपासून ठाणे (Thane) व कल्याण (Kalyan) येथून उमेदवारी कोण लढवणार हा प्रश्न उभा होता. १ मे रोजी शिवसेनेने अधिकृत घोषणा करत कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे तर ठाणे मतदार संघातून नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित केले. शिवसेनेने ट्विट करत याबाबद्दल माहिती देखील दिली होती. आज २ मे रोजी डॉ. श्रीकांत शिंदे यांची भव्य प्रचार रॅली कल्याण येथून निघणार असून या शक्तीप्रदर्शनाकडे सर्वांचे एकच लक्ष लागले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत या भव्य रॅली बद्दलची माहिती दिली होती. त्यात त्यांनी ‘विकासाला साथ देऊया चला अर्ज भरुया’ आणि ‘कल्याणकरांचे मत विकासाला’ अशा वाक्यांचा प्रयोग करत नागरिकांना रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिंदेंनी केले आहे. या रॅलीचा प्रारंभ श्री गणेश मंदिर, आप्पा दातार चौक, फडके रोड डोंबिवली पूर्व येथून होणार असून ती संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल पर्यंत असेल. रॅलीचा मार्ग कसा असणार याबद्दलची माहितीसुद्धा श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. गणेश मंदिर डोंबिवली पासून ही रॅली सुरु होऊन मॉडर्न हॉटेल चौक, चार रास्ता नका, लोकमान्य टिळक चौक, जिमखाना रोड ते संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल हे ठिकाण रॅली कव्हर करेल. सकाळी ९ वाजता ही रॅली सुरु झाली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या वडिलांचे आभार मानले. आज होणाऱ्या या रॅलीमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे शक्तीप्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.

त्यांचं सहकार्य पहिल्यापासून आहे, प्रेम आहे

“आज नरेश म्हस्के आणि माझी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली. त्यानंतर राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला भरभरुन आशीर्वादही दिला. येणाऱ्या काळात ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांची सभा देखील होईल, त्यांचं सहकार्य पहिल्यापासून आहे, प्रेम आहे”, असे खा.श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Latest Posts

Don't Miss