Sunday, May 19, 2024

Latest Posts

‘मुख्यमंत्री पदानंतर उद्या हे स्वत:ला नरेंद्र मोदी समजून पंतप्रधानपदावर दावा सांगतील’ : उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Uddhav Thakeray And Sanjay Raut Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार तथा सामानाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित करण्यात आला. मुलाखतीच्या पहिली भागा विषयी काल संपूर्ण दिवस राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप चालूच होते. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर निशाणा साधला आहे. या वेळी भाजपवाल्यांनो सावधान राहा असा म्हणत उद्धव ठाकरे बोलले, “स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो सावधान, उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि देशाच्या पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते आणि शेवटी त्याची चटक”,अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.

आधी भाजपासोबत युती असताना शिवसेनेवर अन्याय होतो असे म्हणायचे हे…

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असे यांचे म्हणणे असयाचे. भाजप सोबत युती नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय,” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी केला.

हेही वाचा : 

ठाकरेंना शिवसेनेपासून दूर करण्याचा हा त्यांचा कट आहे; उद्धव ठाकरे

Latest Posts

Don't Miss