Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुरलीची मुरली वाजवतो कि आव्हाडांची पुंगी हे लवकरच कळेल, Vasant More यांचा Jitendra Awhad यांना टोला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) पुण्याचे लोकसभा उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर टीका केली आहे. त्यावर वसंत मोरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरे यांच्यावर टीका करत म्हणाले, “वसंत मोरे आणि वंचित हे काय गणित आहे हे मला कळतच नाही. वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, हे मला समजतच नाही. मीपण कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात. पुण्यात मुरलीची मुरली वाजवावी असं तर त्यांच्या मनात नाही आहे ना?” जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेवर वसंत मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी मुरलींची मुरली वाजवतो का आव्हाडांची पुंगी हे लवकरच कळेल,” अश्या शब्दांत त्यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत ते पुढे म्हणाले, “वसंत मोरेला लोक चेहऱ्याने ओळखत नाहीत तर विकासकामांमुळे ओळखतात. वसंत मोरेंची विकासकामे प्रकाश आंबेडकरांना माहित आहेत. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून मला उमेदवारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड कलाकार आहेत हे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. ते कसे कलाकार आहेत, हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मी मुरलीची मुरली वाजवतो कि आव्हाडांची पुंगी हे लवकरच कळेल.”

पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात तिहेरी लढत होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार? हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक असणार आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss