Friday, April 19, 2024

Latest Posts

विदर्भात, नाशिक परिसरात अवकाळीमुळे प्रचंड नुकसान, विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार’ ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’ अश्या घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. तर यावेळी विधानसभेत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मागणी देखील केली आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही. ही मदतही तात्काळ द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition in Legislative Assembly Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत केली. चंद्रपूर, नाशिक, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे अवकाळी पाऊस, गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, संत्रा बाग, डाळिंब, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूही देण्यात आली नाही. ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार केली. यानंतर सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.

विरोधकांनी याप्रसंगी आज का राज गुंडाराज, गुंडांना पोसणाऱ्या, राजकीय आश्रय देणाऱ्या, वर्षावर गुंडांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरत विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss