Saturday, May 18, 2024

Latest Posts

बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना जे जमले नाही ते आम्ही करून दाखवले, तानाजी सावंत

राजकारणात घडणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे अनेक राजकारणी सध्या चर्चेत येताना दिसत आहे. नुकतेच राहुल गांधी हे नरेंद्र मोदीं बाबतच्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले असताना त्यातच आता नवीन चर्चाना उधाण आले.

राजकारणात घडणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे अनेक राजकारणी सध्या चर्चेत येताना दिसत आहे. नुकतेच राहुल गांधी हे नरेंद्र मोदीं बाबतच्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्याचे दिसून आले असताना त्यातच आता नवीन चर्चाना उधाण आले. समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरु झाला. मात्र आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वात आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्यानं उपस्थितीतांमध्ये देखील अस्वस्थता सुरु झाली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भर सभेत एक असे वक्तव्य केले कि, त्यांनी राजकारणातल्या मोठ्या नेत्यांसोबत त्यांनी आपली तुलना केली. त्यामुळे राजकारणात नवीन वादाला सुरवात होण्याची चिन्ह दिसत आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांचे बंधूदेखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. सावंत बंधू यांनी पंढरपूर येथे जी सभा घेतली त्या सभेला जवळपास ७ लाख नागरिक जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही, असे वक्तव्य भर सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभेला जमलेल्या गर्दीमध्ये थेट मंचावरून केले. आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपण कशी कमाल घडवून आणली हेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी याना गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली,असं तानाजी सावंत यांनी कार्यक्रमात सांगितले. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वतःच्या पक्षामधून रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण कसे मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यातुन सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी स्वतःहून ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

तसेच कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचे प्रकर्षाने समोर येत होते. सावंत एवढ्यावरच शांत बसले नाही तर त्यांनी बोलण्याच्या ओघात सावंत यांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोलाही लगावला. सावंत म्हणाले, जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे मी दाखवून दिलं असतं, असेही ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात हे सर्व सांगताना आरोग्यमंत्र्यांनी धडधडीत खोटी माहिती देत सर्वांची फसवणूक देखील केली आहे.असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीमधून समोर येताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हे एकदाच १९९० साली पंढरपूरला गेले होते आणि त्यांनी त्यांची विराट सभा हि रेल्वे मैदानावर घेतली होती. असे सांगितले जाते की , ही सभा इतकी मोठी झाली की, त्या सभेनं पूर्वीचे सर्व विक्रम मोडले होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सभेत केलेल्या २०१७-२०१८ च्या शिवसेना मेळाव्याबाबत सांगत होते, तो मेळावा देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा झाला होता. या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक सोलापुरात जमले होते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होणार असल्यानं तानाजी सावंत हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणार असून आता तर त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss