Saturday, May 18, 2024

Latest Posts

बायकोच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

काही दिवसांपासून महाराष्ट्रमधले अनेक नेते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तर आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रवी राणा आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्यात आधी सुद्धा शाब्दिक वाद झाल्याचं दिसून आलं होत. तर आज रवी राणा यांच्यावर टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. बायकोच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही, असा टोला देशमुख यांनी रवी राणा यांना लगावला आहे.

नितीन देशमुख म्हणले, रवी राणा हा ****खोर आहे. तो बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा आहे. मी त्याच्यासारखं बायकोच्या भरवशावर राजकारण करीत नाही. मतदारच आगामी निवडणुकीत राणाला त्याची जागा दाखवणार.. बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार अन् त्यातून त्याला धडाही शिकवणार, असे म्हणत आमदार नितीन देशमुखांनी राणांना त्याच्याच मतदारसंघात घेरण्याचे दिले संकेत.

त्यानंतर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी देखील पलटवार केला आहे. नितीन देशमुख कोण आहे हे मला अधिवेशनात माहित झाले होते. नागपूर पोलिसांना मारहाण (Beating Nagpur Police) प्रकरणात ३५३ त्यांच्यावर दाखल झाली होती. उद्धव ठाकरे (उद्धव ठाकरे) यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी चुकीचे कामे केले. ज्यांनी पाप केलं आहे. त्या पापाचा घडा भरला आहे. हे कायद्याचे राज्य आहे. नियमाने चालणारे सरकार आहे. कोणी कायदे हातात घेतले तर त्याला कायदेशीर उत्तर देण्याचे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये होणार आहे, असे रवी राणा म्हणाले.

हे ही वाचा:

हे ३ तरुण बुमराह, शमी आणि भुवनेश्वरला देणार टक्कर, विश्वचषक २०२३ साठी स्पर्धा सुरू

धनुष्यबाण नेमका कोणाचा ? निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss