Sunday, May 19, 2024

Latest Posts

‘… आपल्याला कोणी वाली नाही’ – अजित पवार

शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत. रोज ३ ते ४ शेतकरी आत्महत्या होतात, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय.

शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत. रोज ३ ते ४ शेतकरी आत्महत्या होतात, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय. या वर्षी राज्यात भरपूर पाऊस होऊनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय उरतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तसेच ते पुढे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) ज्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी एक कॉल केली की लगेच कांदा निर्यात खुली व्हायची. आता मात्र, आपल्याला कोणी वाली नसल्याचे वक्तव्य राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत, आपण खाणार काय? असा खडा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.

सध्या दुधाला चांगला दर मिळत आहे. पण निर्मळ दूध द्या. कोणतीही भेसळ करु नका असे आवाहन देखील अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. आपण अंबालिका कारखान्याची कॅपेसिटी वाढवली आहे. त्यामुळं जिथे ऊस लावायचा आहे तिथे लावा. जिथे कांडे लावायची आहे तिथे लावा. जो कारखाना चांगला भाव देईल आणि ज्याचा काटा चांगला असेल त्याला ऊस द्या असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला होता. तो आम्ही ताब्यात घेतला. त्यावेळी साहेब आम्हाला म्हणाले की, कशाला घेतला. आता तोच कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये असल्याचे अजित पवार म्हणाले. दौंड तालुक्यात ७०० मतांनी आमचा उमेदवार पाडला. तुम्ही मला ताकद दिली की मला काम करायला हुरूप येतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

साखरेच्या बाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. शेतकऱ्यांची पिळवणूक झाली नाही पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. शेतकरी कधी संपावर जात नाहीत. त्याच्या पोटाला पिळ बसला तर अडचणी येतो. याचा विचार सरकारने करावा, असे पवार म्हणाले. नवीन सरकार आल्यापासून राज्यात रोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाऊस पडून देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी या सरकारला वेळ नाही. ते केंद्राकडे बघतात असेही पवार म्हणाले. दौंडमध्ये ऊस जास्त आहे. भीमा पाट्स कारखाना सुरुवातीला चांगला चालला, आता तर २ वर्ष झालं बंदच आहे. यावेळी बोलताना एकाने टाळ्या वाजवल्या, यावेळी टाळ्या काय वाजवतो कपाळ माझं असं अजित पवार म्हणाले. २१ वर्ष झालं राहुल कुल यांच्या हातात साखर कारखाना आहे. राहुल कुलला विचारा अनेकदा मी त्याला मदत केली आहे. जिल्हा बँकेने 38 कोटींची सवलत दिली आहे. ही सवलत दुसरी कोणी दिली नसती असेही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

Shivsena : शिवसेना पक्ष चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात, निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार

शिमग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही – देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar on Eknath Shinde : मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, काहींची भाषण नको इतकी लांबली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss