Saturday, July 27, 2024

Latest Posts

ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावचं लागेल – DEVENDRA FADNAVIS

जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. नथुराम गोडसेबद्दल प्रश्न विचारला असता, नथुराम गोडसेंबाबत काय झालं ते मला माहिती नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील स्पष्टपणे माहिती आहे की, ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल,  त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि छगन भुजबळ यांच्या मुद्दयांवर म्हणाले.

कुठेही सरसकट निर्णय घेतलेला नाही

जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल. पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही, ही भाजपची भूमिका आहे, आणि भुजबळ साहेबांशी मी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे. ओबीसींवर कुठेही अन्याय होत असेल तर आपण त्यामध्ये परिवर्तन करू. त्याच्यात आवश्यक त्याप्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या ते आपण करू. मुख्यमंत्र्यांचे मत आहे की, आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठेही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळेल. जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येतात या विषयांवर दोन्ही बाजूने संयम बाळगला पाहिजे, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा मराठा समाजाच्या बाजूने रिएक्शन देणे हे अत्यंत अयोग्य ठरेल. सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केली आहे. त्यामुळे जी काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे. अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की, सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss