Saturday, July 27, 2024

Latest Posts

सामंत जिकडे सत्ता तिकडे जातात, वैभव नाईकांचा टोला

, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची २५ वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील २५ वर्षात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत  यांनी केली. याच मुद्द्यावरुन उदय सामंत आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यात विधीमंडळ परिसरात खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली.

बीएमसीमध्ये एखादी चौकशी झाली की, ठाकरेंच्या विरोधातच होईल, असं म्हणणं चुकीचं आहे, असं उदय सामंत म्हणाले. तर बीएमसी ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या नगरविकास खात्याचीही चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे. दरम्यान, नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

 

उदय सामंत विरुद्ध वैभव नाईक यांच्यात विधीमंडळ परिसरात खडाजंगी

दोन्ही नेत्यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना एकमेकांवर टीकास्त्र डागली. दोघांचीही खडाजंदी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ॲाडिटवरून मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यात खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं.

कोण-कोणास काय म्हणालं?

मंत्री उदय सामंत : एखाद्या गोष्टीची चौकशी करणं वेगळं आणि ऑडिट करणं वेगळं. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मुंबई महापालिकेचा निर्णय घेतला म्हणजे ठाकरेंच्या विरोधात असा नाही आणि आम्ही फक्त ॲाडिट करणं म्हणजे, ठाकरेंना इशारा असं नाही. मला विंधीमंडळात प्रश्न आला तेव्हा मी त्यावर उत्तर दिलं, जे काही असेल ते समोर येईल.

वैभव नाईक : यापूर्वीही चौकशी करण्याची भिती अनेकदा दाखवण्यात आली आहे. अधिवेशन आलं की, मागण्या जोर धरतात आणि त्यानंतर मागण्या थंडावतात. एकदाचं काय ती चौकशी करा, आम्ही तयार आहोत, पण आम्ही घाबरणार नाही, चौकशा लावण्यापेक्षा निवडणुकाच लावा

उदय सामंत : वैभव नाईक माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांना एकच सांगतो आम्ही २०२४ पासून ते २०३४ पर्यंत जिंकतच जाणार

वैभव नाईक : सामंत साहेब जिकडे सत्ता तिकडे जातात, त्यांना सत्तेची चाहुल लागते त्यामुळे त्यांना जास्त कळतं

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची २५ वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील २५ वर्षात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी हा फक्त ट्रेलर असल्याचं सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं होतं.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss