Saturday, July 27, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांनी कोणावर निशाणा साधला?, जरांगे यांच्या मागे कोण…

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्वच आमदार अडकून पडल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्वच आमदार अडकून पडल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद आता विधानसभेत उमटले आहेत. यावेळी विधानसभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.

या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्यामागे कोण आहे? त्याची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले आहे की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले होते. ज्या पोलिसांवर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले आहे. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाचा पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन तुम्ही कोणाची आय-माय काढणार असाल तर कसे चालणार असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss