Friday, April 19, 2024

Latest Posts

आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे : रामदास कदम

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) मागील दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) मागील दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आज सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या सभेदरम्यान,शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. रामदास कदम म्हणाले, कोकणामध्ये (Kokan) येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा,उद्धव ठाकरेंजवळ काही शिल्लक नाही, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

रामदास कदम याची सभा रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड मध्ये झाली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि अनंत गीते यांच्यावरही टीका केली आहे. रामदास कदम म्हणाले, आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक राहिले? कोकणामध्ये येऊन काय दाखवणार? या जगामध्ये आपल्या बापाशी बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहे, असा खेचक टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. अनंत गितेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, सात वेळा खासदारकी भोगली तीन चार वेळा मंत्री झाले. कोकणासाठी काय केलं? पाऊस पडला की आळंबी उगवतात तसा निवडणुका आल्या की हा माणूस उगवतो.

आज ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे सिंधुदुर्गात आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या सभेला भाजपने विरोध केला होता. आमच्या नेत्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्या केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले आहेत. सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा तर, राणेंचं होम ग्राउंड म्हणून ओळख असलेल्या कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोलण्यास सभा उधळून लावू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करत आहेत.

Latest Posts

Don't Miss