Saturday, May 18, 2024

Latest Posts

धनुष्यबाण कोणाचं ? पुढची सुनावणी आता होणार १७ जानेवारीला

केंद्रीय निवडणूक आयोगात आज, मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शिंदे धनुष्यबाण कोणाचा या संदर्भात सुनावणी पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत ठाकरे गटाच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि वकील महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तीवाद केला.

सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी घेऊ नये. किंवा निवडणूक आयोगातील सुनावणी ही प्राथमिक की अंतिम आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी सिब्बल यांनी केली. सिब्बल यांचा हा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) आपण सर्व ऑर्डर एकदाच देऊ, असं सिब्बल यांना स्पष्ट सांगितलं. त्यानंतर शिंदे गटाच्या दोन वकिलांनी अतिशय प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. तर ठाकरे गटाला युक्तीवादासाठी १७ जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता सत्तासंघर्षावरील ही सुनावणी १७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय प्राथमिक कि अंतिम असेल या विषयावरून सिब्बल आणि जेठमलानी यांच्यामध्ये झुंपलेली पाहायला मिळाले. यावेळी सिब्बल यांनी म्हटलं,”आमचा जर प्राथमिक युक्तीवाद फेटाळला तर आम्हाला तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल,असं सिब्बल यांनी म्हटलं. दरम्यान निवडणूक आयोगाने,”आम्ही एकत्र ऑर्डर करु”, असं स्पष्ट केलं. तसेच शिंदे गटाकडे आमदार आणि खासदार यांचं बहुमत असल्यामुळे कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटच योग्य आहे”, असा युक्तीवाद वकील महेश जेठमलानी यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून त्याच्या शाखाप्रमुखांपासून, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली, पण शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रे बनावट, असल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

हे ही वाचा:

Uorfi Javed नेमकी आहे तरी कोण ? घ्या जाणून

Makar Sankrant 2023 पतंग उडवण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम, नाहीतर होऊ शकतो तुरुंगवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss