Friday, April 19, 2024

Latest Posts

रक्ताचं पाणी करून पक्ष मोठा करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दूर फेकलंत- Chitra Wagh

माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा सध्या सुरु आहे. या जनसंवाद दौऱ्यात संबोधतांना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर आणि एकूणच राजकीय मुद्द्यांवर कडाडून टीका केली आहे. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षांची युती एका झटक्यात संपवली, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे. 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

उद्धवजी……तुमच्यासारख्या घरभेद्यांनी आमच्या देवेंद्रजींना बोलावं, याच्याइतका दुसरा विरोधाभास नाही. देवेंद्रजींनी पक्ष मजबूत करण्यासाठी माणसं जोडली, तुम्ही शिवसेनेला स्वतःची प्रॅापर्टी समजून माणसं तोडली… रक्ताचं पाणी करून पक्ष मोठा करणाऱ्या नेत्यांना दूर फेकलंत तुम्ही; आमच्या देवेंद्रजींनी प्रत्येकाला जवळ करत उभारी दिली. महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपा त्यांच्या चाणक्यनितीमुळे आहे.. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षांची युती एका झटक्यात संपवली; देवेंद्रजींना पक्षासमोर पदाची कधी मातब्बरी वाटली नाही. उद्धवजी, तुमच्या विध्वंसक हातांनी तुम्ही पक्षाची शकलं केलीत. त्यामुळे खरे घरफोडे तर तुम्ही आहात….

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

अन्नदात्यावर बंदूक रोखणारे हे नादान सरकार आपल्याला खाली उतरवायचंय! मोदींना पण कळलंय, भाजपवाले त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून ते उपरे-बाजारबुणगे भाजपात घेतायंत. माझ्या जनतेने मतं कुणालाही दिली असतील, पण ती जनता माझ्या महाराष्ट्रातली आहे. मी मुख्यमंत्री असताना कुणाच्यातही भेदभाव केला नाही. माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले आधी अश्रू पुसा. अश्रूधूर सोडण्याचा निर्लज्ज कारभार करू नका. भाजप संविधान मानत नसेल, तर संविधानाची ताकद काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे. ‘फोडणवीस’ गृहमंत्री नाही, ‘घरफोडे’ मंत्री! दुसऱ्यांची घरे फोडून, स्वतःची घरे भरतायत. असा टोला उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला होता. 

हे ही वाचा:

भाविकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी अत्याधुनिक उद‌्वाहनाची सोय करावी, Ajit Pawar यांचे निर्देश

आयारामांना राज्यसभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss