Wednesday, February 28, 2024

Latest Posts

Hardik Pandya ला कर्णधार बनवल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर?, दीड लाख फॉलोअर्स झाले कमी…

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. मुंबईने काल दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त केले.

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. मुंबईने काल दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्त केले. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या रोहित शर्माकडून (Rohit sharma) कर्णधारपद काढून घेतले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. हार्दिक पांड्याला मुंबईने कर्णधारपद देताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय.

हार्दिक पांड्याला कर्णधार पद दिल्यानंतर सोशल मिडियावर मात्र चाहत्यांच्या नाराजीचा सूर हा दिसून आला आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर नाराज झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर टीमला अनफॉलो करण्यास सुरुवात केली. काही वेळातच मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स कमी झाले. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये अचानक घट झाल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की चाहत्यांना त्यांचा निर्णय अजिबात आवडला नाही. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, पण तरीही त्याला कर्णधारपदावरून काढून संघाची कमान हार्दिककडे सोपवणे खरोखरच धक्कादायक आहे.

रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवले आहे, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. हिटमॅनने 2013 पासून मुंबईची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. मुंबई इंडियन्स हा पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा सर्वात पहिला आणि पहिला संघ होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल चषक जिंकला.

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि २०२१ पर्यंत तो संघासाठी खेळला. पण २०२२ मध्ये तो नव्याने स्थापन झालेल्या गुजरात टायटन्स या फ्रँचायझीचा भाग बनला. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर पुढच्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये गुजरात संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण त्यानंतर २०२४ च्या आधी, हार्दिक अचानक मुंबई इंडियन्सच्या जुन्या फ्रेंचायझीमध्ये परतला आणि आता तो संघाचा कर्णधारही बनला.

Latest Posts

Don't Miss