Tuesday, May 21, 2024

Latest Posts

T-20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर, ‘हा’ मोठा खेळाडू टीममधून आऊट

बीसीसीआयने (BCCI) आगामी टि-२० वर्ल्डकपसाठी (T-20 World Cup 2024) भारतीय संघ जाहीर केला असून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टि-२० क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे. रोहित शर्मा याला संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा उपकर्णधार असेल.

फलंदाजीमध्ये भारतीय संघाची धुरा कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर असेल याशिवाय विकेटकिपर म्हणून रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे, के एल राहुल आणि ईशान किशन यांचा पत्ता कात झाला आहे. ऑलराउंडर म्हणून उपकर्णधार हार्दिक पंड्यासह शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर आहे. तर, फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या खांद्यावर आहे. कागदावर भारतीय संघ मजबूत दिसत असून वर्ल्डकप साठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. या प्रमुख १५ खेळाडूंशिवाय शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश राखीव खेळाडू म्हणून करण्यात आला आहे.

टि -२० वर्ल्डकपमध्ये भारताचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आलं असून या गटामध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही समावेश आहे. याशिवाय, आयर्लंड, कॅनडा आणि युएसए या संघांचादेखील ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. भारताची पहिली मॅच ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. ९ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हि लढत सगळ्यांना अनुभवता येणार आहे. याशिवाय भारताची तिसरी मॅच १२ जून रोजी यूएसए विरुद्ध होणार असून गटातील चौथी मॅच १५ जूनला कॅनडा विरुद्ध होईल.

हे ही वाचा:

Crickter पांड्याच्या कुटुंबात ‘वायू’ चे आगमन

SRH विरुद्ध मनासारखा स्कोर बनवता आला नाही, २०० हुन जास्त धावा ठोकूनही Ruturaj Gaikwad नाखूश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss