Sunday, May 19, 2024

Latest Posts

KKR च्या रमनदीप सिंहने घेतला IPL 2024 मधला सर्वोत्कृष्ट झेल

रविवारी (५ मे) झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या सामन्यात कोलकात्याच्या लखनऊचा दारुण पराभव केला. या विजायामुळे कोलकाताला ११ सामन्यात १६ गुण मिळाले असून प्लेऑफच्या दिशेने त्यांनी पॉल टाकले आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Aiyyar) नेतृत्वात कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. लखनौवर कोलकाताच्या विजय मिळवला असला तरी चर्चा मात्र रमनदीप सिंह (Ramandeep Singh) याने घेतलेल्या अप्रतिम झेलाची चालू आहे. सध्या सोशल मीडीयांवर या झेलायची चर्चा रंगली असून लोक रमनदीपचं कौतुक करत आहेत.

या सामन्यात रमनदीपणे फिल्डींगचा अद्भुत नजराणा दाखवला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर लखनौच्या सलामीवीर अर्शिन कुलकर्णीचा जबरदस्त झेल घेत रमनदीपणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिचेल स्टार्कने अर्शिन कुलकर्णीला लेन्थ चेंडू फेकला. यावर अर्शिनने फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॅटची कड लागून चेंडू हवेत उडाला. हा चेंडू झेलण्यासाठी सर्कलच्या आत फिल्डिंग करत असलेल्या रमनदीपणे २१ मीटरपर्यंत धाव घेत डाइव्ह मारत हा झेल टिपला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा आयपीएलमधील सर्वोत्तम कॅच असल्याचे बोलले जात आहे.

रमनदीपने फलंदाजीतही आपला दबदबा दाखवत जबरदस्त खेळी केली. रमनदीपने फक्त सहा चेंडूंचा सामना करत २५ धावा केल्या. यात त्याने तीन षटकार खेचले. त्यामुळे कोलकात्याच्या २० षटकांत २३५ धाव केल्या.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सला झटका, १४ कोटींच्या खेळाडूला दुखापत

Hitmanच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स देणार का विजयाचे गिफ्ट?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss