चेन्नई सुपर किंग्सला झटका, १४ कोटींच्या खेळाडूला दुखापत

सध्या आयपीएलच्या मॅचेस चालू आहेत. क्रिकेटप्रेमींचं लक्ष आयपीएलकडे आहे. मागे झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरोधी पंजाबच्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्सला हार मानावी लागली. आता तर पुढील सामन्यांसाठी चेन्नईचे काही महत्वाचे खेळाडू उपस्थित नसतील

चेन्नई सुपर किंग्सला झटका, १४ कोटींच्या खेळाडूला दुखापत

सध्या देशभर आयपीएलची धुमधाम चालू आहे. क्रिकेटप्रेमींचं लक्ष आयपीएलकडे आहे. चेन्नई सुपर किंग्स विरोधी पंजाबच्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्सला हार मानावी लागली. आता तर पुढील सामन्यांसाठी चेन्नईचे काही महत्वाचे खेळाडू उपस्थित नसतील. यामध्ये एका मॅचविनर खेळाडूचाही समावेश आहे. याचबरोबर चेन्नईच्या दोन खेळाडूंना दुखापत देखील झाली आहे. याशिवाय टीम मधील १ खेळाडू मायदेशी देखील परतणार आहे. यामुळे टीमच्या समस्या वाढताना दिसून येत आहेत. यंदाच्या वर्षी चेन्नईने १० सामन्यांमध्ये ५ विजय मिळवले आहेत. जर प्लेऑफ मध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना अजून ३ सामने जिंकावे लागतील. पण खेळाडूंच्या अश्या स्थितीमुळे टीम समोरील आव्हाने वाढताना दिसून येत आहेत.

१४ कोटी रुपये दिलेल्या दीपक चाहरला दुखापत झालेली आहे. पंजाबविरोधीच्या सामन्यात गोलंदाजी करताना दिपकला दुखापत झाल्याचे समजते. झालेल्या या दुखापतीमुळे दिपकला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर चहर परत मैदानावर आला नाही. तो चांगला गोलंदाज असून चांगल्या विकेट्स देखील घेतो त्यामुळे त्याचे नसने टीमसाठी तोट्याचे ठरू शकते. दीपक चाहरसोबतच मथीशा पथीराणा याच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो पंजाब विरोधाच्या सामन्यात देखील उपस्थित नव्हता. पंजाबविरोधी सामन्यात तुषार देशपांडेदेखील टीमचा भाग नव्हता. तो आजारी असल्याने मॅच खेळण्यास आला नसला तरी त्याचे नेमके आजारपण अद्याप समोर आले नाही. तुषार गोलंदाजी अप्रतिम करतो यामुळे तुषार आणि मथीशा पथीराणाची अनुपस्थिती चेन्नईसाठी चिंताजनक आहे. मुस्तफिजुर रहमान याला देखील बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून बोलावून घेण्यात आलं होत. पण पुढील मॅचेस साठी मुस्तफिजुर उपस्थित नसेल. तो बांगलादेश टीममध्ये परतला असून यापुढील मॅचेस मध्ये तो दिसणार नाही. दीपक चाहर, पथिराना, तुषार याच्यानंतर मुस्तफिजुरही नसल्यानं चेन्नईची गोलंदाजी कशी पार पडेल यावर प्रश्नचिन्ह उभा राहील आहे.

हे ही वाचा:

भरउन्हात उसाचा रस पिताय ? एकच ग्लास प्या नाहीतर……

संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे – Amol Kirtikar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version