Friday, May 17, 2024

Latest Posts

Happy Birthday Suryakumar Yadav : जाणून घेऊया, टीम इंडियाच्या हुकुमी एक्काबद्दल

भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अनेक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमारने इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत.

भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अनेक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमारने इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने शतक झळकावले. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आज (१४ सप्टेंबर) त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्याच्या काळात देशातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जात आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव आता टी-२० विश्वचषकमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्काय’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू फलंदाजी सहित गोलंदाजी देखील करतो. जबरदस्त शॉट्स खेळत आणि अफलातून फलंदाजी करत सूर्यकुमारने भारतीय संघात आपले स्थान अढळ ठेवले आहे.

 मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमारचा या जागतिक स्पर्धेसाठी १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. इशान किशननेही या सामन्यात पदार्पण केले होते आणि ३२ चेंडूत ५६ धावा केल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना ७ विकेटने जिंकला. सूर्यकुमार यादवला याच मालिकेतील चौथ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तो डावाच्या चौथ्या षटकात मैदानात आला. जोफ्रा आर्चरच्या षटकातील ५ वा चेंडू फाइन लेगच्या दिशेने त्याने षटकार मारला.

 T२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ५७ धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. सूर्यकुमारने आतापर्यंत १३ एकदिवसीय आणि २८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ अर्धशतकांच्या मदतीने ३४० धावा केल्या आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने ८११ धावा केल्या आहेत. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. त्याने मुंबईसाठी द्विशतकही झळकावले आहे. एवढेच नाही तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४ विकेट्सही घेतल्या आहेत.

 तसेच सूर्या आता इतका मोठा फलंदाज झाला आहे की त्याच्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना फार काही सांगण्याची गरज नाही. पण तरीही काही रंजक किस्से आणि किस्से आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या दमदार खेळीने लोकप्रिय झालेल्या खेळाडूला क्रिकेटसोबत दुसऱ्या एका खेळात रस होता. क्रिकेटपूर्वी सूर्यकुमार यादव लहानपणी बॅडमिंटन देखील खेळायचा, हे सर्वांना माहीत आहे. पण, त्याने दोन खेळांपैकी क्रिकेटला जास्त महत्त्व का दिले, हे माहीत आहे का? कारण सूर्यकुमार यादव लहानपणी क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बराच वेळ घराबाहेर असायचा. या विचारानेच त्याला बॅडमिंटनपटू होण्यापासून रोखले आणि भारताला असा अद्भुत फलंदाज मिळाला.

 एमएस धोनीप्रमाणेच सूर्यकुमार यादवलाही कारची आवड आहे. अलीकडेच त्याने मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप खरेदी केली आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाच्या या नव्या कारची किंमत २.१५ कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे १.२२ कोटी रुपयांचा लँड रोव्हर डिफेंडर, ३९-४२ लाख रुपयांपर्यंतची स्कोडा सुपर्ब आहे. त्याच्याकडे निसान जोंगा आणि पोर्च ९११ टर्बो कार देखील आहे.

तसेच आज भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (१४ सप्टेंबर) त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिम्मिताने सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

हे ही वाचा:

Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss