Saturday, May 18, 2024

Latest Posts

भारताचा क्रिकेट संघ जगामध्ये नंबर १ ला

भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) नागपूर कसोटीमध्ये जिंकून १-० अशी या मालिकेमध्ये आघाडी घेतली होती. या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) शतक, रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरी, अक्सर पटेलची दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची (R Ashwin) फिरकी या जोरावर भारताच्या संघाने पहिल्या संघात एक डाव आणि १३२ धावांनी हि कसोटी जिंकली.

भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) नागपूर कसोटीमध्ये जिंकून १-० अशी या मालिकेमध्ये आघाडी घेतली होती. या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) शतक, रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरी, अक्सर पटेलची दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची (R Ashwin) फिरकी या जोरावर भारताच्या संघाने पहिल्या संघात एक डाव आणि १३२ धावांनी हि कसोटी जिंकली. या भारताच्या विजयामुळे भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूं आयसीसी कसोटी क्रमवारीतखूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ हा कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. २०-२० (T-२०), वन डे (One Day) आणि कसोटी (Test Cricket) यतींनाही फॉरमॅट यामध्ये आता भारत हा नंबर १ वर आहे. आशियामधील हा पहिलाच संघ आहे. जगामध्ये हा दुसरा संघ ठरला आहे.

भारताचा फिरकी पट्टू आर अश्विन हा पुन्हा एकदा टॉप १० मध्ये आला आहे आणि त्या सोबत रवींद्र जडेजाने सुद्धा मोठी झेप घेतली आहे. आर अश्विनने पहिल्या डावात ३-४२आणि दुसऱ्या डावात ५-३७ अशी कामगिरी केली आहे. आर अश्विन हा कसोटी मध्ये क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियन (Australia) वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) हा पहिल्या क्रमांकावर आहे. जडेजाने सुद्धा या मालिकेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे जडेजाने पहिल्या डावात ५-४७ आणि दुसऱ्या डावात २-३४ अशी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा ने नागपूर मध्ये १२० धावांची खेळी केली होती आणि तो आता त्याने नागपूर कसोटीमध्ये शतक झळकवल्यावर तो १० व्या क्रमांकावरून ८ व्या क्रमांकावर आल आहे.

भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व

कसोटीमध्ये नंबर १
२०-२० मध्ये नंबर १
वन डे मध्ये नंबर १
२०-२० नंबर १ फलंदाज – सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
वन डेमध्ये नंबर १ गोलंदाज – मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj)
कसोटीमध्ये नंबर १ वन ऑल राऊंडर – रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
कसोटीमध्ये नंबर २ गोलंदाज – आर अश्विन (R ashwin)
कसोटीमध्ये नंबर २ ऑल राऊंडर – आर अश्विन (R Ashwin)
२०-२० मध्ये नंबर २ ऑल राऊंडर – हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

Legends League Cricket : इंडिया महाराजा संघाची धुरा सांभाळणार ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss