Saturday, July 27, 2024

Latest Posts

International Cricket Council ने केले रँकिंग जाहीर, ‘हा’ खेळाडू ठरला नंबर १

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टेस्ट फॉरमॅटमध्ये क्रिकेट विश्वातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. आयसीसीने याबाबतचे रँकिंग (ICC Men’s & Women’s Cricket Rankings) ७ फेब्रुवारीला जाहीर केले. ही रँकिंग जाहीर केल्यानंतर बुमराहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमुळे बरेचजण गोंधळल्याचे पाहायला मिळाले. बुमराहला नेमके काय बोलायचं आहे, असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक किंवा दोनचं लोकं तुमचं समर्थन करतात, पण शुभेच्छा द्यायला मात्र हजारो लोकं येतं असतात. सपोर्ट करायला खूप कमी पण यशस्वी जाल्यार कौतुक करायला अनेकजण उपस्थित असतात. अशा आशयाची पोस्ट जसप्रीत बुमराहने शेयर केली होती. हा सोशल मीडियाचा एक मीम आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच जणांनी या पोस्टकडे एक टोमणा म्हणून पाहिले.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ची बॉलिंग सर्वांना अवाक करणारी आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने १५ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या कसोटीत त्याला आराम मिळणार नसून बुमराह खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोठी कसोटी मालिका असल्याने जसप्रीत बुमराह याला आराम मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, प्रसिद्धीच्या शिगेला पोहचलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ला खेळू न देता आराम दिला असता, तर ते चुकीचे ठरले असते, असे त्याच्या चाहत्यांकडून म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss