SRH विरुद्ध मनासारखा स्कोर बनवता आला नाही, २०० हुन जास्त धावा ठोकूनही Ruturaj Gaikwad नाखूश

SRH विरुद्ध मनासारखा स्कोर बनवता आला नाही, २०० हुन जास्त धावा ठोकूनही Ruturaj Gaikwad नाखूश

सध्या देशभरात आयपीएलचे (IPL 2024) वारे वाहू लागले आहेत. काळ (रविवार, २८ एप्रिल) रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Haiderabad) सामन्यात चेन्नईने हैदराबादवर ७८ धावांनी विजय मिळवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या ९८ धावांच्या खेळीमुळे तसेच डॅरिल मिचेलच्या (Daryl Michell) अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने २० षटकांमध्ये २१२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद १८.५ षटकांमध्ये १३४ धावाच बनवू शकले. चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवूनही चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड मात्र वेगळ्याच कारणावरून नाआखुष झाला आहे.

ऋतुराज गायकवाड सामन्यानंतर बोलतांना टीमचे कौतुक केले. “तुषार देशपांडेने ४ विकेट घेतले.  त्यानंतर मागोमाग  मुस्तफिजूर रहमान आणि मथिशा पथिराना यांनी २ विकेट घेतले. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतला. ऋतुराजने मॅच कुठे पलटली यावर भाष्य केले आहे. “जड्डूनं मॅच विनिंग स्पेल टाकला, वेट कंडिशन असताना अशी कामगिरी करणं सोपं नसतं. माझ्यासाठी तो मॅच विनिंग स्पेल आहे”.  ऋतुराज जडेजाच्या बॉलिंगचे कौतुक करत असे म्हणाला. जडेजाने हैदराबादचा खेळाडू  नितीनकुमार रेड्डीची विकेट घेतली.

“चेन्नईला २२० – २३० धावांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. मी माझ्या शतकाचा विचार करत नव्हतो. आम्ही या मॅचमध्ये त्या धावांपर्यंत पोहचू शकलो नाही याच मला दुख आहे,” असे ऋतुराज गायकवाडने सांगितले. यावर्षी आयपीएलमध्ये १० पैकी ५ संघाच्या नावावर १० गुण आहेत. पण कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) १० गुणांबरोबर दुसऱ्या स्थानावर आहे. पुढे चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, लखनौ सुपर जाएंटस आणि दिल्ली कॅपिटल्स असे क्रमांक आहेत. आता प्लेऑफमध्ये कोण जाणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

Uddhav Thackeray Live: कोकण हे शिवसेनेचे हृदय, गद्दारांचे दोन मालक दिल्लीत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version