spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

Hitmanच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्स देणार का विजयाचे गिफ्ट?

रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी झाला. एका सामान्य घरात तो लहानाचा मोठा झाला. रोहितला क्रिकेटमध्ये करियर करायचे होते म्हणून तो घरापासून लांब राहत होता. २००२ फेब्रुवारीमध्ये त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले. नंतर त्याला २०१३ पासून हिटमॅन असे नाव पडले. आता तो मुंबईचा कॅप्टन म्हणून नव्हे तर एक प्लेअर म्हणून आयपीयएलमध्ये खेळत आहे. त्याच्या जागी आता हार्दिक पंड्यांला कॅप्टन करण्यात आले आहे. रोहित शर्मा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आयपएलमध्येही त्याची खूप मोठी कामगिरी आहे.

रोहित शर्माला एका टेस्ट मॅचचे १५ लाख रुपये मिळतात. वन डे मॅचचे ६ लाख आणि टी- २० चे ३ लाख घेतो. रोहित शर्मा अनेक ब्रँड जाहिराती पण करत असतो. रोहित शर्माची एकुण २१४ कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे. याशिवाय रोहित शर्माची अकॅडमी पण आहे. “ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन वेळा शतक करून मैदानातून बाहेर पडत होतो. पीडी नावाच्या व्यक्तीने सांगितले की, तू हिटमॅनसारखं खेळतोस. आमचं बोलणं रवी शास्त्रीने ऐकले आणि कॉमेंट्रीच्या दरम्यान मला हिटमॅनच्या नावाने हाका मारू लागले”, असे रोहितने मुलाखती दरम्यान सांगितले होते.

रोहितने २०-२० मध्ये ४ शतक केले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ५ वेळा मुंबई इंडियन्स मॅच विजयी झाली आहे. रोहित शर्माने २०१५ साली रितिकासोबत लग्न केले. या दोघांना आता एक मुलगी पण आहे. रोहित आणि रितिकाच्या मुलीचे नाव समायरा आहे. आज त्याचा ३७ वा वाढदिवस आहे आणि आज लखनौ सुपर (Lucknow Super Giants) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) ची मॅच आहे. ही मॅच पाहणं फार रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

जर उन्हाळ्यात राहायचं असेल फ्रेश तर ही स्मुदी नक्की ट्राय करा

असे करा करवंदाचे लज्जतदार लोणचे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss