Saturday, May 18, 2024

Latest Posts

Nita Ambani यांचा विश्वास, वुमेन्स प्रीमियर लीग हि महिलांसाठी कौशल्य दाखवण्याची संधी

वुमेन्स प्रीमियर लीगचा (Women's Premier League) लिलाव १४ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावामध्ये भारताच्या महिला तर आहेतच पण त्याच्या सोबत विदेशी महिला खेळाडूंची सुद्धा बोली मोठ्या रकमेला लागली आहे.

वुमेन्स प्रीमियर लीगचा (Women’s Premier League) लिलाव १४ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावामध्ये भारताच्या महिला तर आहेतच पण त्याच्या सोबत विदेशी महिला खेळाडूंची सुद्धा बोली मोठ्या रकमेला लागली आहे. लिलाव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीता अंबानी म्हणाल्या कि, आजचा दिवस महिला क्रिकेट साठी ऐतिहासिक आहे आणि वुमेन्स प्रीमियर लीग हे महिला क्रिकेटमध्ये नक्कीच क्रांती घडवेल. महिला क्रिकेट साठी महिलांना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि त्या म्हणाल्या कि हा दिवस महिला क्रिकेट साठी खुशीचा दिवस आहे आणि या लिलावानंतर आम्ही सगळेच फार खुश आहोत.

१४ फेब्रुवारीला WPL हा लिलाव मुंबईमध्ये पार पडला आणि हा लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाची मालकीण आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी आणि यांच्या बरोबर त्यांचा मुलगा आकाश अंबानी, संघाचे प्रमुख प्रशिक्षक चार्लोथ एटवर्डस (Charlotte Atwards), श्रीलंकन क्रिकेटपटू महेला जयवर्धन (Mahela Jayavardhan), बॉलिंग कोच झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि बँटिंग कोच देविका पालशिकर (Devika Palashikar) हे या लिलावामध्ये उपस्तिथ होते. महिला खेळाडूंचे स्वागत करताना नीता अंबानी आनंद होत आहे असे त्या म्हणाले आणि आमच्या मुंबई इंडियन्स च्या टीम मध्ये पूजा वस्त्राकर आणि नॅट सीवर ब्रंटसारखे खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अनेक नवीन खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. या दोन्ही खेळाडू माझ्या संघामध्ये असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी आयपीएल बाबत सुद्धा प्रतिक्रिया दिली.

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी म्हणाल्या कि रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या दोघांमध्ये बरेच सौम्य आहे. नीता अंबानी म्हणाल्या की, रोहित शर्मा हा एक उत्तम खेळाडू आणि उत्तम कर्णधार म्हणून प्रगती करताना पहिले आहे. गेल्या १० वर्ष पासून रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग आहे त्यानंतर आम्ही आता हरमनप्रीत कौर चे आमच्या मुंबई इंडियन्स च्या कुटुंबात स्वागत करत आहोत. रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर हे दोघेही खेळाडू अनुभवी आणि विजेती मानसिकतेचे आहेत. आणि हे दोघेही युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत आणि हे दोघेही खेळाडू माझ्या संघामध्ये आहेत त्याचा मला आनंद होत आहे. भाताच्या U-१९ च्या महिलांनी सलग दोन वर्ष T-२० वर्ल्ड कप वर नाव कोरले आहे. त्या महिलांचे नीता अंबानी यांनी कौतुक केले आणि भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. नीता अंबानी या इंरनॅशन ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्य असल्यांच्या पहिल्या महिला आहेत.

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss