Saturday, May 18, 2024

Latest Posts

Prithvi Shaw पुन्हा एकदा अडकला एक नवीन वादात, भररस्त्यात मुलीसोबत वाद

भारताचे क्रिकेटपटू नेहमीच कोणत्या न कोणत्या तरी प्रकरणामध्ये चर्चेत असतात. भारताचा क्रिकेट पटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ चा एक व्हिडीओ(Video) हा सोशल मीडियावर(Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

भारताचे क्रिकेटपटू नेहमीच कोणत्या न कोणत्या तरी प्रकरणामध्ये चर्चेत असतात. भारताचा क्रिकेट पटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ चा एक व्हिडीओ(Video) हा सोशल मीडियावर(Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ रस्त्यावर एक महिलेसोबत बाचाबाची करताना स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताचा क्रिकेट पटू पृथ्वी शॉ आणि एक महिला यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्या महिलेच्या संबंधित एका मित्राने तो व्हिडियो तयार केला आहे. या सर्व प्रकरणांनंतर पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाल्याची चर्चा होत आहे. पृथ्वी शॉ च्या मित्राच्या गाडीवर दोन जणांनी हल्ला केला होता असे सांगण्यात येत आहे.

आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्याना हाणामारी झाली आहे असे सांगण्यात येत आहे. हि घटना जोगेश्वरी लिंक रोड च्या जवळ असलेल्या लोटसच्या पेट्रोल पंप जवळ झाली आहे. त्या आधीच पृथ्वी शॉ च्या मित्राने सांगितलेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉ जेव्हा एक हॉटेल मध्ये पार्टी करत आसनात त्याचा एक सेल्फी काढण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर पृथ्वी शॉ हॉटेलमधून बाहेर येऊन तो दुसऱ्या कारने घरी जाण्यास निघाला होता. त्यांच्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कार मध्ये पृथ्वी असल्याचे संबंधितांना वाटले आणि त्यांनी कार वर हल्ला केला.

सोशल मीडियावर आणखी काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये त्या महिलेसोबत पृथ्वी शॉ ची बाचाबाची होत आहे असे दिसत आहे. महिलेच्या संबंधीत मित्र व्हिडीओ तयार करत आहे आणि तो मित्र पृथ्वी शॉ वर आरोप सुद्धा करत आहे.परंतु हे नक्की प्रकरण काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मीडियाच्या रिपोर्टनुसार पृथ्वी शॉ च्या मित्राला धमकी देण्यात आली होती जर त्याला हे प्रकरण दडपायचे असेल तर त्याला ५० हजार द्यावे लागतील जर पृथ्वी शॉ च्या मित्राने जर असे केले नाही तर तो आरोपी त्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवले अशी आरोपीने त्याला धमकी दिली. पृथ्वी शॉ च्या मित्रावर हल्ला झाल्यावर तो मित्र तुटलेली काच असलेली गाडी घेऊन तो ओशिवरा पोलीस ठाण्यात गेला. याच्या या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांचा तपस सुरु आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss