Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Sachin Tendulkar चा व्हिडिओ वायरल, टी शर्ट पाहून गाडी थांबवत घेतली चाहत्यांची भेट

सचिन तेंडुलकरचे काही व्हिडिओ देखील चर्चेचं नेहमी कारण ठरत असतात. अश्यातच आणखी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचं दिसून येत आहे.

भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या ट्रिप्स मुले चर्चेत असतो कधी त्याच्या वक्तव्यामुळे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचे काही व्हिडिओ देखील चर्चेचं नेहमी कारण ठरत असतात. अश्यातच आणखी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचं दिसून येत आहे. क्रिकेट प्रेमी बद्दल बोलायचे झाले त्यांच्या साठी सचिन तेंडुलकर हा देव माणूस आहे असं म्हंटल जात. आणि जर साक्षात देव आपल्याला भेटला तर हे सुख नक्कीच प्रत्येकाला आवडणारे असते.

सचिनने मैदानातून निवृत्ती घेतली असली, तरी त्याने दिलेल्या मनमुराद आनंदाने चाहते आजही भारावून जात असतात. त्यामुळे त्याची एक झलक किंवा अनपेक्षित भेट होण्यासाठी चाहते आतूर असतात. असाच एक नशीबवान चाहत्याला त्याचा देव पत्ता विचारत रस्त्यात भेटल्याने आकाश ठेंगणे वाटू लागलं आहे. असच काहीस चित्र सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसून येत आहे. सचिन तेंडुलकर याने (Sachin Tendulkar Viral Video) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर गाडीतून त्याच्या कामानिमित्त प्रवास करत असताना दिसत आहे. त्याच्या गाडीच्या पुढे एक दुचाकीवरून मुलगा प्रवास करताना दिसून येत आहे. पण यामध्ये कुतूहलाची बाबा म्हणजे त्या चाहत्याने गाडीसमोर एक चाहता दुचाकीवरून जाताना दिसतो. त्या चाहत्याने मुंबई इंडियसन्सची जर्सी परिधान केली आहे. त्या जर्सीवर त्याने तेंडूलकर आणि त्याचा १० जर्सी नंबर आणि खाली आय मिस यू असं लिहिलं आहे.

चाहत्याचा टी शर्ट पाहून सचिनने त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाठत थांबवले. यावेळी चाहत्याने गाडी बाजूला थांबवल्यानंतर त्या चाहत्याचा त्याच्याच डोळ्यावर विश्वास बसत नसल्याचे व्हिडिओमधून एकंदरीत दिसते. सचिनने गाडीची काच खाली करताच चाहत्याने नमस्कार केला. चाहत्याने नमस्कार केल्यानंतर सचिन त्या चाहत्याला पहिल्यांदा तुझा पहिल्यांदा टी शर्ट दाखव अशी विनंती करतो. यानंतर सचिनसोबतच्या आठवणी करताना त्याची सही सुद्धा घेतो. यानंतर चाहत्या हेल्मेट घालून दुचाकी चालवत असल्याचे सांगत कौतुकही सचिन करताना दिसून येतो. आपण स्वत:ही सीट बेल्ट वापरत असल्याचे सांगतो. यानंतर चाहत्याला काळजी घे म्हणून सचिन त्याचा निरोप घेतो. तर सचिनने ट्विट करत म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरला भेटला, चाहत्यांकडून माझ्यावर व्यक्त होणारं प्रेम पाहून माझं हृदय आनंदाने भरुन येतं. जेव्हा अनपेक्षित मार्गाने लोकांकडून प्रेम येतं असतं तेव्हा आयुष्य सुंदर होऊन जातं. सचिनचा हा व्हिडिओ वेगाने ट्विटरवर व्हायरल होत असूनही चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे ही वाचा:

राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना केला संतप्त सवाल, आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का ?

नव्या वर्षात नाटक-सिनेमाच्या तिकिटात होणार वाढ,मनोरंजन पडणार महाग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss