“Suryakumar yadav” करणार कमबॅक DC विरुद्ध उतरणार मैदानात

“Suryakumar yadav” करणार कमबॅक DC विरुद्ध उतरणार मैदानात

देशभरात आयपीएल (IPL) ची चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्स च्या चाहत्यांना खुशखबर मिळणार असून सूर्यकुमार यादवची आज एक चाचणी झाली. यामध्ये तो पूर्णपणें तंदुरुस्त आहे. आणि तो लवकरच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा सामना खेळणार आहे. ७ एप्रिल ला हा सामना होणार आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवने शेवटचा ट्वेन्टी-20 सामना खेळला होता. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. सूर्यकुमार हा चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बॅटिंग करायला येतो. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्या दरम्यान मुंबई ला ६ धावांनी हार पत्करावी लागली होती. सूर्यकुमारच्या वापसीमुळे कॅप्टन हार्दिक पांड्आ याता बिनधास्त असणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सलग तीन मॅचमध्ये पराभव झाले होते. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामने झाले होते. सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणून ओळखतात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा हा सामना मुंबई इंडियन्स विजयी होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. मुंबई इंडियन्स सध्या (Points table ) दहाव्या क्रमांकावर पोचली आहे. मुंबई ला अजुन एकही सामन्यात विजय मिळवत आला नाही. सूर्यकुमार यादव ने आयपीएलचे १३९ सामने खेळले असून . त्याने १ शतक आणि २१  अर्धशतक झळकावले  आहे. सुर्याकुमार यादवने   ट्वेन्टी-20 प्रकारात १०३ सर्वोच्च धावा केल्या आहेत. १२४ डावांमध्ये ३१. ८५ च्या सरासरीने आणि १४३. ३२ च्या स्ट्राइक रेटने ३२४९ धावा केल्या आहेत.

हे ही वाचा:

Gudipadwa का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

अंडरवर्ल्डशी संबंधामुळे आणि महेश भटसोबतच्या जवळीकीमुळे ‘हि’ अभिनेत्री होती चर्चेत!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version