Thursday, May 16, 2024

Latest Posts

अंडरवर्ल्डशी संबंधामुळे आणि महेश भटसोबतच्या जवळीकीमुळे ‘हि’ अभिनेत्री होती चर्चेत!

बॉलीवूडच्या ७० आणि ८० च्या दशकातली ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चांगलीच चर्चेत होती. दुसरी तिसरी कोणी नसून ती म्हणजे परवीन बाबी (Parveen Babi) तिचा आज वाढदिवस आहे. परवीन बाबीचा जन्म ४ एप्रिल १९५४ रोजी झाला. परवीन बाबीने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मॉडेलिंग करायला सुरुवात केली. हि बोल्ड ग्लॅमरस अभिनेत्रीला कॉलेजमध्ये असल्यापासून सिगारेट ओढण्याची सवय होती. बॉलीवूड निर्माते बी आर इशारा यांनी एक दिवस सिगारेट ओढताना परवीन बाबीला पहिला आणि तो दिवस तिच्यासाठी विशेष झाला. परवीन बाबी यांनी १९७३ मध्ये ‘चरित्रीरा’ या चित्रपटात काम करून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. यांनी अनेक चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवली होती. अभिनयाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. महेश भट्ट सोबत तर कधी अंडरवर्ल्डशी असलेल्या कनेक्शनमुळे कायमच चर्चेत असायची.

त्याकाळात ती इतर अभिनेत्र्यांपेक्षा जास्त मानधन घेत होती. या अभिनेत्रीचा शेवट अत्यंत वाईट झाला. परवीन बाबीचा पॅरानोइड स्किझोफ्रेनिया या आजरामुळे २० जानेवारी २००५ रोजी मृत्यू झाला. या आजराबद्दल समजल्यावर ती चित्रपटसृष्टी पासून लांबच राहत होती. एक दिवशी अचानक गायब झाल्या तिच्या बदल च्या चर्चा चालू झाल्या कुच्ठे गेल्या, कोणासोबत गेल्या कोणालाच माहिती नव्हता. त्यांच्यावर अंडरवर्ल्डची माणसं नजर ठेवून होते आणि त्यांनीच तिला गायब केला होत असं सांगितलं जात होत. ६ वर्षांनी परवीन बाबी मुंबईत आली होती .

बॉलीवूड अभिनेत्री परवीन बाबीच अनेकांसोबत नाव चर्चेत होत. डॅनी डेन्झोंपा, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु होत्या.  त्यांचं नातं ४ वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नव्हता. महेश भट्ट आणि परवीन बाबीच नातं खूप खास होता. महेश भट्टच लग्न झाला होत. तरी पण परवीन बाबीच महेश भट्ट यांच्या सोबत संबंध होते. २००६ रोजी महेश भट्ट दिग्दर्शित ‘वो लम्हें’ हा चित्रपट परवीन बाबीसोबत असलेल्या नात्यावर काढला होता.

हे ही वाचा:

Gudipadwa का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

Aryan Khan करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss