Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Gudipadwa का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षातील पहिला सण होय . हा सण उत्सहात साजरा केला जातो. चैत्राच्या सुरवातीला थंडीच वातावरण कमी होत. आणि उष्णतेत वाढ होते. या वातावरणात मानवी शरीराला काही त्रास होऊ नये. म्हणून पूर्वपार प्रथा सांभाळत आहोत. गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. रामायणामध्ये भगवान श्री रामाने १४ वर्षाचा वनवास संपून आयोध्येला ते परत आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी आयोध्यानगरीमध्ये दारात गुढ्या उभारून, अंगणात रांगोळी काढून, दाराला तोरण लावली होती. तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. त्याचबरोबर आजून एक सत्य एतिह्यासिक कथा सांगितली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्टात गुढी उभारली जाते. असं देखील सांगितलं जात.

आठ ते दहा दिवस आधी गुढीपाडव्याच्या तयारीला घरोघरी सुरवात केली जाते. घराची साफसफाई केली जाते.गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेजण पहाटे उठतात आणि तयारीला लागतात. घरातील स्त्रिया पारंपरिक पद्धतीने तयार होतात. अंगण साफ करून छान रांगोळी काढली जाते. प्रसन्नमनाने यादिवसाची सुरुवात केली जाते. पुरुषमंडळी पारंपरिक पोशाखात तयार झाल्यानंतर गुढी उभारायला घेतात. गुढीची काठी बांबूची असते. घरच्या दाराजवळ ही काठी आणून प्रथम तिला स्वच्छ धुतली जाते. काठीला कडुलिंबाचे पाच किंवा साथ डाळे बांधले जातात. त्याचबरोबर हळदी कुंकूंचे टिकल्या लावल्या जातात . बांबूच्या काठीच्या शेंड्याला नवा कपडा, फुलांची माळ, साखरेची माळ,कडुलिंबाच्या डहाळ्या एकत्र करून बांधतात. त्यावर तांब्या ठेवला जातो. तांब्याला पण हळदी कुंकू लावले जाते . घराच्या उजव्या बाजूला पाटावर हे गुढी उभी केली जाते. पाटाच्या आजूबाजूला सुंदर रांगोळी काढली जाते. पाट हा चांगला फुलांनी सजवला जातो. गुढी ची काठी हि व्यवस्थित घराला बांधली जाते आणि गुढी आनंदाने उभी केली जाते.

घरोघरी श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा बेत करतात. प्रत्येकजण आवडीप्रमाणे गोडधोड करतात. पारंपरिक पद्धतीने पुरी श्रीखंड किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर घरातील सर्व मंडळी एकत्र बसून श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा आस्वाद घेतात. या शुभ दिवसाला सर्वजण महत्वाच्या कामाला सुरुवात करतात. या दिवशी सोने, नवीन गाड्या, नवीन घर यांची खरेदी करतात.

असा हा सण आनंदाने आणि उत्सहाने साजरा केला जातो.

हे ही वाचा:

Dragon Fruit चे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Aryan Khan करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss