spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केली लखनौच्या फलंदाजांची बत्ती गुल

काल आयपीएलचा एलिमिनेटर (Eliminator) सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ (Qualifier 2) का सामना खेळणार आहे.

काल आयपीएलचा एलिमिनेटर (Eliminator) सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ (Qualifier 2) का सामना खेळणार आहे. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा आकाश माधवाल (Akash Madhawal) ३.३ षटकात ५ गडी बाद करून अप्रतिम कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुंबई लखनौ सुपर जायंट्ससमोर (Lucknow Super Giants) १८३ धावांचे लक्ष उभे केले होते. लखनौ सुपर जायंट्च्या खराब फलंदाजीमुळे त्याचे सर्व फलंदाज १०१ धावा करून सर्व फलंदाज बाद झाले आणि मुंबईने ८१ धावांनी विजय मिळवला.

काळ पार पडलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या एलिमिनेटर सामन्यामध्ये लखनौचा संघ ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. कालचा हा सामना चेपॉक स्टेडियमवर Chepauk Stadium) पार पडला. विजयी झालेला मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्ससोबत Gujarat Titans) क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे. हा क्वालिफायर २ चा सामना २६ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायर २ चा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडणार आहे.

 

क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची काय नवी रणनीती असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. त्याच बरोबर एलिमिनेटर सामन्यामध्ये विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स समोर गुजरातचे आव्हान असणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ हा मागील वर्षाचा विजेता संघ आहे आणि या सीझनमध्ये सुद्धा गुजरातच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. क्वालिफायर २ मध्ये कोणता संघ बाजी मारेल आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai super kings) संघ अंतिम फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नई समोर मुंबई इंडियन्स चा संघ आव्हान ठेवेल की पुन्हा एकदा गुजरात टायटन्स भिडेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss