spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

IPL 2024 ची उत्सुकता अखेर संपणार, आज होणार वेळापत्रक जाहीर

क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामाबद्दल हि एक आनंदाची बातमी समोर आहे.

IPL 2024 Schedule Announcement Live Streaming : क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामाबद्दल हि एक आनंदाची बातमी समोर आहे. आज आयपीएलचं वेळापत्रक (IPL 2024 Schedule) जाहीर होणार आहे. आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती.

आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयपीएलच्या १७ व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हे वेळापत्रक जाहीर होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network ) आयपीएलचं वेळापत्रक लाईव्ह पाहता येईल. तसेच हे वेळापत्रक आज संध्याकाळी जाहीर होणार असून तुम्ही ते जिओ सिनेमा अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.

२२ मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. साधारणपणे आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेते आणि उप विजेते यांच्यामध्ये होतो. त्यानुसार, पहिला सामना धोनीच्या चेन्नई विरोधात शुभमन गिल याच्या गुजरात संघामध्ये होऊ शकतो. जूनमध्ये टी20 विश्वचषक पार पडणार आहे, त्यामुळे आयपीएल स्पर्धा मे अखेरपर्यंत संपेल.विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी असू शकतो. टी 20 विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी होणार आहे. १ जूनपासून टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

दिनांक २२ मार्चपासून आयपीएलच्या १७ व्या हंगामाला सुरुवात करण्याची योजना असल्याचं अरुण धुमाळ यांनी सांगितलं. देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे. पहिल्या १५ दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होईल. उर्वरित सामन्याचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर झाल्यावर करण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितलं. आज आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss