Wednesday, April 24, 2024

Latest Posts

कोण करणार अंतिम फेरीत प्रवेश, मुंबई की गुजरात

आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ Indian Premier League 2023) मध्ये क्वालिफायर २ (Qualifier 2) सामना होणार आहे. आजचा सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स Gujarat Titans) आणि पाच वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ या दोन संघामध्ये आजचा सामना रंगणार आहे.

आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ Indian Premier League 2023) मध्ये क्वालिफायर २ (Qualifier 2) सामना होणार आहे. आजचा सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स Gujarat Titans) आणि पाच वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ या दोन संघामध्ये आजचा सामना रंगणार आहे. पहिल्या क्वालिफायर च्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स ला १५ धावांनी पराभूत केले. आजच्या या सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. आज हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. आयपीएल २०२३ (IPL2023) चा फायनलाच सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार आहे.

गुजरात टायटन आणि चेन्नई सुपर किंग (Chennai Super King) हे दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ २ वेळा तर गुजरात टायटन्सचा संघ १ वेळा विजयी झालेला आहे. मागिल सामने पाहता मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. या आधी पार पडलेल्या मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने २७ धावांनी विजय मिळवला होता. आजचा जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश करेल. अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. यंदाची आयपीएल २०२३ ची ट्रॉफी कोणता संघाच्या नावावर होईल या कडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ११ –
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११ –
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss