Saturday, March 2, 2024

Latest Posts

भारतीय रेल्वेकडून RAC प्रवाशांसाठी घेण्यात आला मोठा निर्णय

भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवासात काहींना तिकीट मिळत नाही तर काहींना RAC तिकीट मिळते. या सगळ्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यात अनेकदा बसण्याच्या जागेवरून किंवा इतर काही कारणामुळे वाद होत असतात. रेल्वेमध्ये अनेकदा चादर किंवा टॉवेल वरून लोक भांडतात. पण आता भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशाची भांडण होणार नाहीत. सगळ्यात जास्त भांडण ही आरएसी प्रवाशांमध्ये होत असतात. ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळत नसल्यामुळे लोक वेटिंग लिस्टमध्येही तिकीट घेत असतात. तिकीट कन्फर्म नाही झाली तर कमीत कमी RAC तरी मिळेल असा विचार अनेकदा केला जातो. मात्र आता हे सगळं लवकरच संपणार आहे.कारण भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या सीएमडीला पत्र पाठवले आहे. आता RAC असलेल्या प्रवाशाना वेगळे बेडरोल देण्यात येणार आहे. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी प्रवाशांना (एसी चेअर कार वगळता) आता ब्लँकेट, बेडशीट आणि टॉवेल, उशीसह संपूर्ण बेड रोल किट देण्यात येणार आहे. एसी क्लासच्या प्रवासासाठी आरएसी प्रवाशांकडून वसूल करण्यात येणाऱ्या भाड्यात बेडरोल चार्जेसचा समावेश यात करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी लिनन आणि संपूर्ण बेडरोल किटची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना इतर प्रवाशानंप्रमाणे सोयीसुविधा देणे आणि त्यांचाही प्रवास आनंददायी करणे हा या मागचा मूळ हेतू आहे.

आरएसी तिकीटमध्ये बाजूला असलेल्या खालच्या बर्थवर प्रवाशानाची व्यवस्था करण्यात येते. यामध्ये एका बर्थवर दोन प्रवाशांचे बुकिंग केले जाते. पण ट्रेनमध्ये एखादी तिकीट रिकामी असल्यास त्याची बर्थ कन्फर्म होण्याची शक्यता असते. पण काही शक्य न झाल्यास दोन्ही प्रवाशांच्या प्रवास निदान चांगला व्हावा,याची काळजी घेतली जाते. त्यामुळे तिकीट कन्फर्म नाही झाली तरी प्रवास नीट होण्यासाठी रेल्वेने लक्ष दिल्याचे समजून आले आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

पुण्यात भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss