Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Amazon पाठोपाठ आता Vodafone देखील कर्मचारी कपातीच्या तयारीत, तब्बल ११ हजार…

सध्या जगभरामध्ये जजगतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

सध्या जगभरामध्ये जजगतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Amazon , Meta, Google , Apple अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. आता टेलिकॉम कंपनी असणारी Vodafone देखील आपल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने (Vodafone) तब्बल ११,००० कर्मचार्‍यांना कामावरुन (Layoffs) कमी करण्याचे सांगितले आहे.

व्होडाफोन कंपनीच्या नवीन बॉस मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत ११,००० नोकऱ्या कमी केल्या जातील. नोकऱ्यांमध्ये एवढी मोठी कपात कंपनीच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे होईल. कंपनीच्या नवीन बॉसने सांगितले की व्होडाफोनच्या रोख प्रवाहात मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे. या वर्षी सुमारे 1.5 अब्ज युरोचा तुटवडा अंदाज आहे. गेल्या महिन्यात कायमस्वरूपी नियुक्ती झालेल्या लोकांची व कंपनीची कामगिरी चांगली नसल्याचे डेला वाले यांनी सांगितले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डेला व्हॅले यांनी सांगितले की आमचे प्राधान्य ग्राहक, साधेपणा आणि वाढ आहे. अशा स्थितीत दूरसंचार क्षेत्राच्या शर्यतीत राहण्यासाठी गुंतागुंत दूर करण्याबरोबरच संस्थेचे काम सोपे केले जाणार आहे. या कारणास्तव नोकऱ्या कमी करणे आवश्यक आहे. व्होडाफोन समूह भारतासह अनेक देशांमध्ये व्यवसाय करतो. या कंपनीत सुमारे १ लाख लोक काम करतात. ११,००० नोकऱ्यांमधील कपात ही या कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे. व्होडाफोनने सांगितले की ते या आर्थिक वर्षात सुमारे ३.३ अब्ज युरो रोख उत्पन्न करेल. त्याच वेळी, मार्चच्या अखेरीस, तज्ञांनी ४.८ अब्ज युरोच्या तुलनेत सुमारे ३.६ अब्ज युरो अपेक्षित केले होते.

व्होडाफोन आयडियाच्या सहकार्याने भारतात दूरसंचार सेवा प्रदान करते. येथे गेल्या काही वर्षांपासून त्याचा व्यवसाय कमी होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रातील ही पहिलीच कंपनी असेल जी जागतिक स्तरावर एवढ्या मोठ्या संख्येने कामावरून कमी करेल. जर्मनी ही कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथेही कंपनीची खराब कामगिरी सुरूच आहे. समूहाच्या मूळ उत्पन्नात १.३ टक्के घट नोंदवली गेली आहे आणि मूळ उत्पन्न १४.७ अब्ज युरोवर पोहोचले आहे.

हे ही वाचा : 

MIvsLSG, आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि कृणाल पांड्या आमनेसामने

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss