Bank Holidays in February 2024 : फेब्रुवारी (November) महिना अवघ्या काही तासांवर आला आहेत. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिना हा २९ दिवसांचा आहे. चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. फेब्रुवारी हा महिना इतर महिन्याच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशातच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढत आहे पण बँक तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत
फेब्रुवारी महिन्यामधील बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी तपासा आणि त्यानंतरच तुमच्या बँकांसंबंधित कामाचं नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण १५ दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) ३ आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर १४ दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतील. काही राज्यांमध्ये १४ दिवस बँका बंद म्हणजे फक्त १५ दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील.
Bank Holiday List In February : फेब्रुवारी महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
4 फेब्रुवारी : रविवार
10 फेब्रुवारी : दूसरा शनिवार
11 फेब्रुवारी : रविवार
10 ते 12 फेब्रुवारी : लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी
14 फेब्रुवारी : वसंत पंचमी निमित्त हरयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
15 फेब्रुवारी : लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
18 फेब्रुवारी : रविवार
19 फेब्रुवारी : छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकांना बंद राहतील.
20 फेब्रुवारी : मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी
24 फेब्रुवारी : चौथा शनिवार
25 फेब्रुवारी : रविवार
हे ही वाचा:
मराठमोळ्या पद्धतीत होणार आमिर खानच्या लेकीचं लग्न,इरा आणि नुपूर लवकरच बांधणार लग्नगाठ
शेतकरी आक्रोश मोर्चात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे नेतृत्व